भातखंडेचे सैन्य दलातील जवान छोटू ठाकरे प्रदीर्घ देशसेवेनंतर सेवानिवृत्त

0

भातखंडे (प्रतिनिधी) येथील मातृभूमी रक्षक छोटू श्रावण ठाकरे हा सैन्य दलातील जवान १ ऑगस्ट २०२० रोजी आपली २० वर्ष १६ दिवस एवढी प्रदीर्घ देशसेवा पूर्ण करून सेवानिवृत्तझाला असून हा जवान जळगाव येथे सैन्य दलात भरती झाला.नंतर गोवा या ठिकाणी त्याने बेसिक त्यांनी घेतले .बेसिक ट्रेनिंग घेतल्यानंतर सर्वप्रथम तो अंबाला युनिटला गेला. त्यानंतर जामनगर याठिकाणी फिल्डमध्ये काम केले. तद्नंतर इलाहाबाद गेला पुढे श्रीनगर या ठिकाणी देखील फिल्डमध्ये काम केले. त्यानंतर जालंदर या ठिकाणी युनिटमध्ये गेला. नंतर उधमपुर याठिकाणी फील्डमध्ये सेवा दिली. उधमपूर आला नंतर सिग्नल रेकॉर्डला होता .त्यानंतर त्यांचे युनिट पुणे या ठिकाणी आले. नंतर श्रीनगर या ठिकाणी आला शेवटी त्यांचे युनिट भोपाळ या ठिकाणी आले. अशाप्रकारे ही सुखरूप मातृभूमीची सेवा त्याने सुखरूप पणे केली.

त्याच्यासेवाकाळातील अतिशय महत्त्वाचा प्रसंग त्याने विशद केला तो म्हणजे २०१६ मधील एक प्रसंग सांगितला तो म्हणजे बुरहान वानी ज्या वेळेस श्रीनगर या ठिकाणी मारला गेला. त्याचा वचपा काढण्यासाठी त्याच्या ग्रुप मधील काही आतंकवादी आमच्या युनिटवर हल्ला करण्यासाठी लक्ष ठेवून होते गेले होते. त्यांनी काही दिवसानंतर प्लॅन करून युनिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असता परंतु तो प्रयत्न या युनिटने हाणून पाडला त्यावेळेस पोस्टचे जवानांनी आतंकवाद्यांना शरण येण्यास सांगितले .परंतु त्यांनी तिकडून फायरिंग केली त्याला उत्तर म्हणून त्यात बुऱ्हाण वाणीच्या गटातील दोन आतंकवाद्यांना त्यांनी कंठस्नान दिले होते.

यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्यांना सेना मेडल बहाल करण्यात आले होते. त्यात ८ मद्रास इंजीनियरिंग तर युनिट ए एस सी कोर्स यांना सेना मेडल देण्यात आले होते. त्यात हा जवान सुखरूप बचावला होता अशाप्रकारे मातृभूमीची वीस वर्ष सेवा करून काल तो सुखरूप आपल्या मायदेशी भातखंडे गावी परत आला त्याच्या या देशसेवेबद्दल ग्रामस्थांनी त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.