मोफत आरोग्य तपासणीसाठी मोहल्ला क्लिनिकची सुविधा

0

अमळनेर (प्रतिनिधी):-तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोहल्ला क्लिनिकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सदर ठिकाणी ज्या नागरिकांस ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डायरिया ही लक्षणे असतील अशा नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर दि.०३ ऑगस्ट ते ०८ ऑगस्टपर्यंत कालावधीत राबविण्यात येणार आहे.

यासाठी तांबेपुरा/सानेनगर भागातील नागरिकांनी डॉ.डी.एम.पाटील, पैलाड/ताडेपुरा भागातील नागरिकांनी डॉ.एस.एन.भादलीकर, आर.के.नगर भागातील नागरिकांनी डॉ.हेमंत कदम, ढेकु रोड भागातील नागरिकांनी डॉ.निलेश पाटील, न्यु भागातील नागरिकांनी डॉ.नितीन पाटील, झामी चौक भागातील नागरिकांनी डॉ.हितेश मोरे यांच्या दवाखान्यात सकाळी १२.०० ते दुपारी ०२.०० यावेळेत जाऊन मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी.
तसेच तालुक्यातील सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की,अनावश्यक बाजारात गर्दी करु नका,आवश्यक असल्यास घराबाहेर पडा अन्यथा घरात राहुन प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.