वाकोद येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

पहूर, ता जामनेर (वार्ताहर) :- जामनेर तालुक्यातील वाकोद येथील 40 वर्षीय तरुणाने राहत्या घरात छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सचिन लालचंद गोसावी (वय 40) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती,  रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पियुष सचिन गोसावी हा मूलगा आपल्या वडिलांना घराचा दरवाजा उघण्यासाठी गेला असता घरातून काहीएक आवाज आल्यामुळे तो आपल्या काकांकडे गेला.त्याचे काका अजय लालसिंग गोसावी यांनीही आवाज देऊन पाहीले मात्र घरातून कुठलाही प्रतिसाद त्यांना न मिळाल्याने त्यांनी शेजारच्या दोन-तीन जणांना बोलावून  घराचा दरवाजा उघडला असता सचिन गोसावी हा त्यांना छताला असलेल्या हुकाला गळफास अडकवून लटकलेल्या अवस्थेत आढळला.  मयत सचिन गोसावी हा मजुरी करून उदरनिर्वाह भागवित होता. त्याने घराचा दरवाजा बंद करून छताला असलेल्या हूकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली . घटनेची माहीती कळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला . सचिन गोसावी यांना पहूर ग्रामीण  रुग्णालयात आणले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषीत केले.याबाबत अजय लालचंद गोसावी यांनी पहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मयत सचिन गोसावी यांच्या पश्च्यात  पत्नी सुनीता गोसावी , दोन मुली , मुलगा असा परिवार आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.