भुसावळ केबलचा कर्मचारी अपघातात ठार

0

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील खडका रोड भागातील भुसावळ केबल नेटवर्कवर कार्यरत कर्मचारी खडका चौफुल्‍लीवर अपघातात जागीच ठार झाल्‍याची घटना दि.२ रोजी रात्री १० वाजेदरम्‍यान घडली.

गौसिया नगर भागातील रहिवासी व भुसावळ केबल नेटवर्कचा कर्मचारी मुनीर(वय अंदाजे २७) हा खडका चौफुल्‍ली वर दुचाकीने गेला असता एका जड वाहनाखाली सापडल्‍याने जागीच ठार झाला.घटनास्‍थळी बघ्‍यांची मोठी गर्दी जमली होती.बाजारपेठ पोलीसांनी तात्‍काळ पोहोचून मदतकार्य केले.

मयत मुनीरचे आई-वडील मयत असल्‍याने भुसावळ केबल नेटवर्कचे संचालक मो.सलीम यांनी माणुसकी जिवंत ठेवत त्‍याला मदतीचा हात दिला होता.पालकत्‍व स्‍विकारून मुनीरचे त्‍यांनी कुठलाही विचार न करता रोजगारासह स्‍वख:र्चाने धुमधडाक्‍यात लग्‍नही लावून दिले होते. मुनीरच्‍या ईदच्‍या दिवशी दुर्दैवी मृत्‍यूने हळहळ व्‍यक्‍त केली जात आहे.मयत मुनीरच्‍या पश्‍चात पत्‍नी व दोन मुले असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.