देशात कोरोनाचा कहर सुरूच ; 24 तासांत 52 हजार 972 रुग्णांची नोंद

0

नवी दिल्ली : देशात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत 52 हजार 972 रुग्णांची नोंद झाली तर, 771 रुग्णांचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी एकाच दिवसात 50 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील रुग्ण संख्या 18 लाख 03 हजार 696 झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे देशात करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. देशात आतापर्यंत 11 लाख 86 हजार रुग्ण बरे झाले आहे. तर  5 लाख 79 हजार 357 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर 38 हजार 135 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

या सगळ्या दिलासादायक बाब म्हणजे देशात तब्बल 2 कोटी लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. रविवारी एकाच दिवसात 3.18 लाख लोकांचा चाचण्या करण्यात आल्या. तर, देशात एकाच दिवसात जवळजवळ 41 हजार रुग्ण निरोगी झाले आहे. यासह एकूण निरोगी रुग्णांची संख्या आता 11 लाख 86 हजार झाली आहे. यासह देशाचा रिकव्हरी रेट 65.8% झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.