जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच ; आज ३६५ रूग्ण आढळले

0

जळगाव: जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून आज दिवसभरात नव्याने ३६५ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहे. त्यात सर्वाधिक ९२ कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. त्यामुळे जिह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ७५३ झाली आहे. दिवसभरात १३ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात ३६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात रविवारी नव्याने ३६५ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ९२, जळगाव ग्रामीण २९, भुसावळ २८, अमळनेर २९, चोपडा ४५, पाचोरा ३०, भडगाव १५, धरणगाव ७, यावल ७, एरंडोल ४, जामनेर १६, रावेर १५, पारोळा ८, चाळीसगाव ३४, बोदवड ५, इतर जिल्ह्यातील एक अशी रूग्ण संख्या आहे.

दिवसभरात १३ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर ६, पाचोरा तालुक्यातील २, अमळनेर, एरंडोल, जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगर आणि धरणगाव येथे प्रत्येकी एका बाधीत रुग्णांचा मृत्यू आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.