जिल्ह्यातील कोरोना संसर्ग काही थांबेना ! आज २८५ नवे रूग्ण आढळले

0

जळगाव : जिल्‍ह्‍यात सुरू असलेला कोरोनाचा उद्रेक अजून थांबण्याचे नाव घेत नाहीय. आज दिवसभरात कोरोनाचे नवे २८५ नवे रूग्‍ण आढळून आले आहे. त्यामध्ये जळगाव शहरात सर्वाधिक ७५ रूग्ण आढळून आले असून शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा २९१० वर पोहचला आहे. जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांचा आकडा ११ हजार ३८८ वर पोहचला आहे.

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ७५, जळगाव ग्रामीण १८, भुसावळ १२, अमळनेर १६, चोपडा २०, पाचोरा ३३, भडगाव ११, धरणगाव २५, यावल ०१, रावेर ०९, पारोळा ०६, जामनेर ३५, रावेर २९, पारोळा ५, चाळीसगाव २७, मुक्ताईनगर ०६, इतर जिल्ह्यातील ०१.

दिलासादायक बाब अशी की, आज दिवसभरात २८४ रूग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. तर दिवसभरात ०९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात जळगाव शहरातील ४, अमळनेर तालुक्यातील ०२ तर जळगाव, एरंडोल, यावल तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.