पारोळा भाजपाच्या वतीने महामर्गावर रास्ता रोको

0

पारोळा (प्रतिनिधी) : येथील भारतीय जनता पार्टी च्या वतीने आज मा,खासदार ए,टी नाना पाटील याच्या नेतृत्वाखाली दि,१ रोजी सकाळी राष्ट्रीय महामार्गा वर रास्ता रोको करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा भाजपा च्या वतीने गायीच्या दुधाला प्रति लि,१० रू अनुदान ध्यावे व भुकटी निर्यातीला ५०रू प्रति किलो अनुदान ध्या,तसेच कापुस मका व ज्वारी सुरू करावी व दुधाला भाव मिळावा युरीया उपलब्ध करून ध्यावा म्हणुन आज सकाळी ११ वाजता महामार्गावर रास्ता रोको आदोंलन करण्यात आले,यावेळी महाविकास आघाडी विरोधात घोषणा देऊन राज्य सरकार चा निषेध करण्यात आला. या वेळी माजीखासदार ए,टी,नाना पाटील, यांनी जिल्हाधिकारी,प्रांत,
यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क साधुन शेतकर्याचा प्रश्नांची त्वरीत दखल घेण्याचे सांगीतले.

यावेळी मा,नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा,भजपा तालुकाध्यक्ष अतुल मोरे,मा,अध्यक्ष मुंकुदा चौधरी, केशव क्षत्रीय, रविद्र पाटील ,धिरज महाजन,विनोद हिंदुजा,नंरेद्र राजपुत, समिर वैध ,गौरव बडगुजर,संकेत दाणेज,सतीश पाटील, यांच्या सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी, उपस्थित होते. या वेळी अॅड ,मोरे यांनी सांगीतले मागील २१ जुलै रोजी संपुर्ण राज्य भर स्थानिक प्रशासनस निवेदने देऊन सुध्दा राज्य सरकार ने या कडे लक्ष दिलेले नाही म्हणुन आज हा रास्ता रोको करीत आहोत, महाविकास आघडी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असुन या सरकार चा आम्ही निषेध करतो.

यावेळी माजी नगराध्य सुरेंद्र बोहरा यांनी ही मार्गदर्शन केले त्यानंतर पारोळा पोलिसाच्या वतीने सर्व रास्ता रोको कर्त्यांना अटक करून सुटका करण्यात आली,या वेळी पारोळा पोलीस स्टेशन चे पोलिस निरिक्षक लिलाधर कानडे ,पो,उ,नि,रविंद्र बागुल,तसेच पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Leave A Reply

Your email address will not be published.