चिवासचे सुयोग पाटील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मानित

0

यावल (प्रतिनीधी) : यावल तहसील कार्यालयात लिपिक

पदावर कार्यरत असलेले चितोडे वाणी समाजाचे सुयोग दिलीप पाटील यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल आज महसूल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन समारंभाध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी फैजपूर डॉ. अजित थोरबोले, उषाराणी देवगुणे तहसीलदार रावेर, जितेंद्र कुवर तहसीलदार यावल तसेच रावेर व यावल तहसील चे कर्मचारी उपस्थित होते.

महसूल दिनानिमित्त सुयोग पाटील (लिपिक – तहसील कार्यालय यावल) यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून माननीय आमदार यांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्यांच्या कडे फोजदारी संकलन, आपत्ती व्यवस्थापन चे संकलनाचे कार्य होते.
दरम्यान

मूळचे रावेर येथील सध्या भुसावळ येथे वास्तव्यास असलेले सुयोग पाटील यांनी फौजदरी संकलन, स्वतंत्र सैनिक पेन्शन, खरीप 2018 चे अनुदान वाटप करणे, अवकाळी अतिवृष्टी अनुदान वाटप करणे, केळी नुकसान 2018 अनुदानाचे वाटप करणे, त्याचप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 वेळी उत्कृष्ट कामगिरी केली.

हे कार्य पाटील यांनी निष्ठेने केले. या सर्व विभागातील त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यात आले. महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन यावल येथे सन्मान करण्यात आला श्री पाटील यांच्यासोबत 21 अधिकारी व कर्मचारी यांना गौरवण्यात आले.

नेहमीच आपल्या कार्याने लक्ष वेधणार सुयोग दिलीप पाटील यांनी आतापर्यंत बोदवड आणि भुसावळ तहसील कार्यालय येथे आपली सेवा प्रदान केली आहे. सध्या पाटील यावल येथे कार्यरत आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या परिवाराला आणि सहकाऱ्यांना दिले आहे या गौरवा बद्दल समाजात आणि नातेवाईकांमध्ये त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दैनिक लोकशाही परिवारातर्फे सुयोग पाटील यांचे अभिनंदन…!

Leave A Reply

Your email address will not be published.