पारोळा व्यापारी महासंघाच्यावतीने पत्रकारांचा सन्मान

0

पारोळा (प्रतिनिधी) : येथील व्यापारी महसंघाच्या वतीने पारोळा शहरातील पत्रकार व सामाजिक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी शहरातील आदर्श शिक्षक स.ध. भावसार सर यांचा ही सन्मान करण्यात आला.

शहरातील सर्व व्यापारी बांधवानी एकत्र येऊन महासंघा ची स्थापना करण्यात आली होती . या महासंघाच्या वतीने शहरातील पत्रकार , नगरसेवक , सामाजिक कार्य. करणाऱ्यांनी कोरोना महामारीच्या या कठीण प्रसंगी विविध मार्गानी व आप आपल्या परिने कोरोना महामारीला थोपवण्यास मद्दत केली कोणी तनाने कोणी मनाने तर कोणी धनाने या महामारी ला थोपवण्यासाठी प्रयत्न केले या सर्वाची जाण ठेवत पारोळा व्यापारी महासंघाने एक लहानगा प्रयत्न म्हणुन या सर्व योध्दान प्रती कृतज्ञा  व्यक्त करण्यासाठी या सर्वाचा सन्मान केला,या प्रसंगी अनेक मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत केले,या सन्मान स उत्तर देताना आदर्श शिक्षक भावसार यांनी सर्व प्रथम महसंघाच्या कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी आशिर्वाद दिले.

तर जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी ही शुभेच्छा देत भविष्यात कधी ही व्यापार्यान वर अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली,तसेच रावसाहेब भोसले यांनी लाकडाऊनच्या काळात आपल्या शहराची बाजारपेठ अधिक काळ बंद राहिली तसेच ही बाजापपेठ लवकरात लवकर कशी उघडता येईल म्हणुन आपण सतत अधिकार्याच्या संपर्कात होतो,तर अभय पाटील यांनी सांगीतले की मागच्या काळात व्यापार्याच्या मनात काही चुकीचे भ्रम निर्माण झाले होते की एखादा अधिकारी कोणाचे ऐकुन काही चुकीचे काम करीत आहे तर ते एकदम चुकीचे आहे,कोणताही अधिकारी कोणाचेही ऐकुन काम करीत नसतो,तर विश्वास चौधरी यांनी सांगीतले की काही जणाचा चुकीच्या माहिती मुळेच आपल्या शहरातील बाजार पेठ इतके दिवस बंद राहीली. या प्रसंगी शहरातील आरोग्य सभापती दिपक अनुष्ठान,नगरसेवक पि,जी,पाटील , नवल चौधरी यांनाही कोरोना योध्दा सन्माने सन्मानीत करण्यात आले. या तीघानी ही या महामारीला थोपण्यासाठी खुप मेहनत घेतली तर पि,जी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की या कोरोना महामारी च्या काळात अनेक जणान वर उपासमारीची वेळ आली होती यात सर्वात जास्त मध्यम वर्गीय लोकाचे हाल झाले होते कारण ते कोणाकडे मागु ही शकत नव्हेत व सांगु शकत नव्हते,तर शहरातील व्यापार्याना कधी ही माझी मद्दत लागली तर मी आपणासाठी सज्ज आहे असे सागुंन त्यानी व्यापार्यान अश्वस्त केले या प्रसंगी शहरातील सर्व पत्रकार बाळासाहेब पाटील ,भिकाभाऊ चौधरी,रावसाहेब भोसले,अभय पाटील,विश्वास चौधरी,संजय पाटील,रमेशकुमार जैन,बाळु पाटील,अशोककुमार लालवानी, योगेश पाटील, राकेश , शिंदे, अभिजीत पाटील, विशाल महाजन बापु वाडिले,तसेच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रीय, उपाध्याक्ष अशोककुमार लालवानी, सचिव संजय कासार,जेष्ठ सल्लागार विलास वाणी,मनोहर हिंदुजा,आकाश महाजन, रमेशकुमार जैन ,धर्मेंद्र हिंदुजा,प्रतिक मराठे,महेश हिंदुजा,रोशन शाहा, अमृत क्षत्रीय , मोहन क्षत्रीय,याच्या सह व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी अपाध्य अशोककुमार लालवाणी यांनी माहिती देत सांगीतले की आपल्या प्रमाणेच शहरातील अन्य घटकांचाही व्यापारी महासंघाच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे यात लोकप्रतिनिधी,प्रशासकिय अधिकारी, पोलिस,डाॅक्टर, सफाई कर्मचारी,तसेच सामाजिक कार्यकर्ते,यांचा लवकरच पारोळा व्यापारी महासंघाच्या वतीने सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली, कार्यक्रमाचे सुत्र संचालन व्यापारी महसंघाचे सचिव संजय कासार यांनी केले, शेवटी पारोळा व्यापारी महासंघाच्या वतीने अध्यक्ष  केशव क्षत्रीय, यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.