कोरोना योध्याच्या प्रमाणपत्र वाटपाचा काही संस्थांनी मांडला बाजार

1

अमळनेर(प्रतिनिधी):– कोरोनाच्या काळात काही सामाजिक संस्थांनी कोरोना योद्धा प्रमाणपत्र वाटपाच्या नावाखाली बाजार मांडला आहे, असे मत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शिंपी यांनी मांडले आहे.

खरतर आपल्या प्राणांची पर्वा न करता लढणारे डॉक्टर्स, पोलीस,सफाई कर्मचारी,पत्रकार,राजकीय अशा अनेक क्षेत्रातील व्यक्ती आपली सेवा अखंडीतपणे करण्याचं काम या कोरोनाच्या काळात करतांना दिसून येताय.पण त्या खऱ्या योध्दांकडे दुर्लक्ष करून फक्त सोशल मीडियावर मिरवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काही संस्था ऊठसूट कुणालाही प्रमाणपत्र देत सुटल्या आहेत,मिळालेल्या माहितीनुसार आता पुरस्कार मिळवण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण पण होतेय.

पण यात जो प्रामाणिक काम करतोय त्या योध्याचं मात्र खच्चीकरण होतांना दिसून येतंय.फक्त नाव, गाव दिल की लगेच पुरस्कार मिळतो,तुम्ही काही काम करा किंवा नका करा.

तरी अशा या सामाजिक संस्थांनी दुसऱ्यांना पुरस्कार वाटण्यापेक्षा स्वतः कोरोना साठी रस्त्यावर उतरून काम करून दाखवलं पाहिजे असे मत सुनील शिंपी यांनी व्यक्त केले आहे.

1 Comment
  1. Manohar kautik Patil says

    कोरोना योद्धा म्हणून ड्युटी कुठे केली..??? किती दिवस केली…???
    त्याचे सरकारी प्रमाणपत्र पाहून त्याला खाजगी सामाजिक संस्थांनी कोरोना योद्धा म्हणून certificate दिले पाहिजे.
    नाहीतर अशा लबाड व खोटारड्या संस्थां वर गुन्हे दाखल केले पाहिजेत.

Leave A Reply

Your email address will not be published.