चर्मकार महासंघातर्फे गुणवत्ता पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार

0

निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) :येथे चर्मकार महासंघातर्फे गुणवत्ता पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार समाज भुषण पांडुरंग अण्णा बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. यावेळी निपाणे येथील गुणवत्ता पात्र यशस्वी विदयार्थी विद्यार्थिनींचा समाजभूषण पांडुरंग अण्णा बाविस्कर व सामाजिक कार्यकर्त्या सुनिता बाविस्कर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

याप्रसंगी पत्रकार लक्ष्मण पाटील माजी सरपंच कमलाकर पाटील निंबा महाजन सखाराम महाजन, खटाबाई महाजन, दुर्गा ताई महाजन, रंजना ताई ठाकूर, प्रतिभा ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी पांडुरंग अण्णा बाविस्कर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तोंड कौतुक केले. शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे हे जो आत्मसात करेल तो विज्ञान युगात कधीही मागे राहाणार नाही याची मी ग्वाही देतोअसे सांगत  विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केला.

यावेळी सुनिता ताई बाविस्कर यांनी देखील आपले विचार व्यक्त केलेत. आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे मुलींनी खचून न जाता चांगला अभ्यास करून पुढे जावे निपाणे माध्यमिक विद्यालयात मुलींनी प्रथम द्वितीय क्रमांकावर उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला यांचा मला अभिमान वाटत आहे असे सांगून मुलीच्या पाठीवरुन कौतुकाचा हात फिरवत गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.