विरावलीची रूकसाना तडवी 12वीच्या इलेक्ट्रॉनिक विषयात राज्यात दुसरी

0

 विरावली, ता. यावल (प्रतिनिधी) : येथील रूकसाना गवाब ताडवी ह्या विध्यार्थीनीला 12वी सायन्स विषयातील इलेक्ट्रॉनिक या विषयात 100 पैकी 99 गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक तर नाशिक बोर्डात पहिला क्रमांक येणाचा मान मिळवला आहे. या बद्दल विरावली गावाच्या वतीने ऍड देवकांत बाजीराव पाटील अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन तथा राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष यांनी तिचा व तिच्या परिवाराचा सत्कार करून पुढील वाटचाली साठी शुभेच्या दिल्या आहेत. रूकसाना ही यावल मधील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने यश मिळवले आहे.

तिची आई मोल मजुरी करत रुक्सरचे शिक्षण पूर्ण करत आहे , स्वतः घरातील सर्व कामे करून रोज शेतातील काम करून आईला मदत करून अभ्यास करत रुक्सनाने खूप परिश्रम करून यश मिळवले. तिला पुढे सायन्स विभागात डिग्री पूर्ण करावयाचे तिने सांगितले .तिच्या या यशा बद्दल विरावली चे ऍड देवकांत पाटील, साने गुरुजी माध्यमिक शाळेचे पर्यवेक्षक एम के पाटील सर, ग्रा.प.सदस्य पवन पाटील,पवन राजपूत, गोकुळ पाटील, सुनील पाटील, संजू तडवी, सिकंदर तडवी, दिलीप निळे, प्रताप पाटील, तुषार पाटील, प्रकाश पाटील यांचे सह विरावली गावा बरोबरच तालुक्यातुन देखील कौतुकासह अभिनंदचा वर्षाव केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.