जळगावात पत्नीच्या खून प्रकरणात पोलीस कर्मचारी निलंबित

0

जळगाव : पत्नीचा मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेला कॉन्स्टेबल नरेंद्र भगवान सोनवणे याला पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी निलंबित केले आहे.

आशाबाबा नगरातील श्यामराव नगरात राहणाºया सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेचा १० जुलै रोजी पहाटे जळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणात प्रथम पती पोलीस कर्मचारी नरेंद्र भगवान सोनवणे, सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश, दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) व नणंद सरला देशमुख (रा.परभणी) यांच्याविरुध्द १३ जुलै रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.  त्यानंतर चौकशी होऊन या गुन्ह्यात २३ जुलै रोजी खून व हुंडाबळीचे कलम वाढविण्यात आले होते. त्याबाबतचा कसूरी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार डॉ.उगले यांनी गुरुवारी नरेंद्र सोनवणे याच्या निलंबनाचे आदेश काढले. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.