राज्यभरात दूध उत्पादकांच्या एल्गाराला सुरुवात

0

मुंबई :दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी आजपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दूधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचं आंदोलन तीव्र करण्याची हाक किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिली होती. यानंतर राज्यातील विविध भागात आज पहाटेपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले असून, महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला अभिषेक करून तसेच ग्रामदेवतांना दुग्धाभिषेक घालून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला आहे. तसेच दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान देण्याची मागणी केली. राज्यातील औरंगाबाद, जालना, अमरावती, सांगली, अकोला, पंढरपूर, पुणे आदी भागात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या दूध आंदोलनामध्ये महायुतीमधील घटक पक्षही सहभागी झाले आहेत. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.