पुलाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या कॉलमच्या खड्ड्यात पडून दोघांचा मृत्यू

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील दरेगाव-लोंढे महामार्गावरील पुलाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या कॉलमच्या खड्ड्यात अंदाज न आल्याने मोटारसायंकलसह दोन जणांचा पडून मृत्यू झाल्याची घटना काल गुरुवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडलीय. हिरालाल पुनजाराम आहिरे (५४) व बालु भिला जगताप (३८) दोघे लेंडाणे ता,मालेगाव, जि, नाशिक असे या मयताची नावे असून याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, शेतीसाठी औषधे घेण्यासाठी शेतकरी हिरालाल आहिरे व बालु जगताप हे दोघे मोटारसायकल (एमएच ४१, झेड ४६३९) वरुन चाळीसगावकडे येते असताना, तालुक्यातील दरेगाव-लोंढे येथे महामार्गाच्या (बहाळ मार्ग) कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने, दोघेही मोटारसायंकलसह कॉलमच्या खड्डात पडले. दोघांनाही जबर मार लागल्यामुळे व रात्रीच्या सुमारास कुठल्याही प्रकारची मदत न मिळाल्याने, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

सकाळी ग्रामस्थाना दोघेही मयत अवस्थेत खड्ड्यात पडल्याचे दिसल्यानतंर त्यांनी ही माहिती तात्काळ पोलीस पाटील सागर पाटील यांना दिली. सागर पाटील यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानतंर घटनास्थळी पोलीस दाखल झाले व त्यांनी पंचनामा करुन दोघांचे ही मृतदेह ग्रामीण पोलीस स्टेशनला पोस्टमार्टमसाठी रवाना केले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.