भारताकडून ऑक्सफर्ड-सीरमला धक्का; मानवी चाचणीला परवानगी नाकारली

0

नवी दिल्ली – देशभरात करोना व्हायरसने थैमान घातले असून लाखो लोकांना याचा संसर्ग झाला आहे. यामुळे करोना प्रतिबंधक लसीकडे सर्वच जणांचे डोळे लागले आहेत. मात्र, ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विकसित करण्यात आलेल्या औषधाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांसाठी सीरम इन्स्टिट्युटने ‘ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’कडे परवानगी मागितली होती. मात्र, लसीच्या मानवी चाचणीसाठी सीरमला डीसीजीआयच्या समितीने परवानगी नाकारली आहे.

भारतात ऑगस्टमध्ये 2 आणि 3 टप्प्यासाठीच्या मानवी चाचण्या सुरू करण्याची सीरम इन्स्टिट्युटची योजना आहे. यासंबंधी मानवी चाचण्यांसाठी सीरम इन्स्टिट्युटने ‘ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’कडे परवानगी मागितली आहे. मात्र, सीरमने सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे तज्ज्ञांच्या समितीने सांगितले आहे. तसेच सीरमच्या या प्रस्तावात आठ दुरुस्त्याही सुचविण्यात आल्या आहेत. यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास सीरमने नकार दिला आहे.

दरम्यान, ब्रिटनमध्ये पाच वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आलेल्या पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्शांनुसार ही लस सुरक्षित आणि स्त्री-पुरुष दोघांमध्ये प्रतिक्रियात्मक ऍन्टीबॉडी अधिक वेगाने उत्पन्न करणाऱ्या असल्याचे निदर्शनास आले आहे. सीरम इन्स्टिट्युटने जेनर इन्स्टिट्युट (ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी)च्या संभाव्य लसीच्या उत्पादनासाठी ऍस्ट्र झेनेका या ब्रिटीश स्वीडन औषध कंपनीबरोबर करार केला आहे. या लसीचे 1 अब्ज डोस तयार करून वितरीत करण्यासाठी हा भागीदारी करार केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.