बोदवड येथील रोज पेटल्स इंग्लिश मेडियम स्कूलचे माध्यमिक शालांत परिक्षेत उज्ज्वल यश

0

बोदवड – येथील दि.बोदवड सार्वजनिक को – ऑफ एज्युकेशन सोसायटी संचलित रोज पेटल्स इंग्लिश मेडियम स्कूलने माध्यमिक शालांत परीक्षा,शैक्षणिक वर्ष सन २०१९ /२०२० च्या परिक्षेत उत्तुंग व घवघवीत यश संपादन केले.शाळेचा निकाल १०० टक्के लागला.

शाळेच्या या दैदिप्यमान निकालात प्रथम क्रमांक चि.विनायक श्रीराम शेळके (७५.४० टक्के ),व्दितीय क्रमांक शेख सोहिल शेख ईस्माईल (७२.८० टक्के),तृतीय क्रमांक चि.रजत धिरजकुमार दोधानी (६९.४० टक्के ) असे गुण मिळवून मानाचा तुरा रोवला.परिक्षेत बसलेल्या सर्व यशस्वी गुणवंतांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल,व्हा.चेअरमन अजयजी जैन,सचिव विकास कोटेचा,माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक प्रकाशचंद सुराणा,तसेच सर्व संचालक सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक तथा शिक्षकेतर  कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.