दिल्लीत डिझेल झालं स्वस्त ; वॅटमध्ये केली मोठी कपात

0

नवी दिल्ली । इंधनाच्या वाढत्या दरामुळं सर्वसामान्य देशातील जनता त्रस्त असून दिल्ली सरकारने तिथल्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. डिझेलवरील वॅटमध्ये मोठी कपात केली आहे. दिल्ली सरकारने डिझेलवर आकारण्यात येणारा वॅट कर ३० टक्क्यावरुन १६.७५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचे दर ८२ वरुन ७३.६४ रुपये होणार आहेत. दिल्लीत प्रतिलिटर डिझेलवर ८.३६ रुपये कमी होणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.

“मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिझेलवरील वॅट कर ३० वरुन १६.७५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दिल्लीत डिझेलचे दर ८२ वरुन ७३.६४ होणार आहेत” अशी माहिती केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. “दिल्लीची अर्थव्यवस्था पुनर्जीवित करणे एक मोठे आव्हान आहे. पण जनतेच्या सहकार्याने हे साध्य करु” असं अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले. दिल्लीत आता प्रतिलिटर डिझेलचा दर ८२ ऐवजी ७३.६४ रुपये असेल. दिल्लीतील व्यापारी आणि उद्योजकांनी दर कमी करण्याची मागणी केली होती असे केजरीवाल म्हणाले. डिझेलच्या वाढत्या दरांमुळे महागाईचा सुद्धा भडका उडतो. आता डिझेलचे दर कमी करुन महागाई नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.