देशात 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद ; पाहा चिंता वाढवणारी आकडेवारी

0

नवी दिल्ली : देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातच एका दिवसात रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात पहिल्यांदाच कोरोना 52 हजार 123 कोरोना रुग्ण सापडले. चिंताजनक बाब म्हणजे २४ तासात आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. 24 तब्बल 775 लोकांचा मृत्यू झाला. देशातील एकूण रुगांची संख्या 15 लाख 83 हजार 792 झाली आहे.

करोनामुळे देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यांमध्ये रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असून, लॉकडाउन शिथिल करण्यासंदर्भातील उपाययोजना खिळ बसलेली दिसत आहे. दुसरीकडे देशातील एकूण रुग्णसंख्या वाढीचा वेगी वाढला असून, २४ तासात आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

या चिंताजनक आकडेवारीत दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात १० लाख २० हजार ५८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर देशात आतापर्यंत ३४ हजार ९६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.