ढेकूरोडवरील नकली दारू,दूध कारखाना उदध्वस्त ; 3 लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त

0

अमळनेर (प्रतिनिधी):– शहरातील ढेकू रोडवरील जय योगेश्वर काॅलनीत एका घरात बनावट दूध व दारूचा अवैध कारखाना सुरू होता. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्याने त्यावर LCB जळगाव व अमळनेर स्थानिक पोलीस यांनी संयुक्त रित्या कार्यवाही करत सुमारे लाखोंचा माल जप्त केला आहे.मॅकडॉल ९ पेट्या १ नग- १५० प्रमाणे ४३२×१५०= ६४,८००,IB-१७पेट्या १ नग किंमत १४० प्रमाणे

८१६X१४० = १४,२४०
मोटर सायकल Activa – ४५,०००
स्पेलंडर ४०,०००
८५००० लिक्वीडचे २०० लिटर ड्रम १५,००० रू प्रमाणे,स्पिरीट ३ड्रम प्रत्येकी३५००×३=१०,५००
दुधाचे कॅन ४,००० प्रमाणे १०,५००/ प्रमाणे अल्युमिनियम २,००० इतर मुद्देमाल ७,३६० दूध बनविण्याचे मशीन १५,००० असा एकूण ३ लाख ११,८४०रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यातील आरोपी विजय अमृत पाटील शिवाजी मांसाराम पाटील,सीमा विजय पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कार्यवाही करताना पोलीस निरीक्षक बापू .जे .रोहम LCB,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,HC- १ दीपक विसावे, डॉ शरद पाटील, दीपक माळी, भटूसिंग तोमर, रवींद्र पाटील,हितेश चिंचोरे,रेखा ईशी,सुधाकर लोहेरे LCB, नारायण पाटील LCB,रामचंद्र बोरसे,मनोज दुसाने,दीपक पाटील,दिपक शिंदे,परेश महाजन,कैलास पाटील इ.पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.