वाढीव लाईट बिल माफ करण्याची भाजपची मागणी

0

धरणगाव (प्रतिनिधी) : कोरोना सारख्या महामारीत गोरगरीब मोलमजुर,शेतकरी,छोटे व्यापारी,हात विक्रेते इत्यादीना लॉकडाऊन कार्यकाळात काम धंदे बंद असल्यामुळे उपजीविकेचा फटका बसला. असे असतांनासुध्दा सरकारने वीज बिल माफ न करता वीज दर वाढवून नागरिकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एप्रिल, मे, जून या तीन महिन्याचे एकत्रित बिल न पाठविता ते माफ करायला हवे तसे न करता जो व्यक्ती तीनही महिन्याचे बिल अदा करेल त्याला 2% सूट देण्यात येईल, पंरतु लॉकडाऊन काळात लोकांचा रोजगार पूर्णपणे बंद होता जेमतेम आता सर्वांची गाडी रुळावर येत आहे आणि त्यातच सरकार व विद्युत मंडळाचा मनमानी कारभार, मात्र भारतीय जनता पार्टी असा अन्याय होत असतांना शांत बसणार नाही म्हणून आज MSEB च्या कार्यालयात वीज बिलांची होळी करून भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले.

त्याचबरोबर जीनस कंपनीचे मीटर लावण्यात येऊ नये अन्यथा आंदोलन करण्यात येईल. आंदोलनाचे नेतृत्व भाजप जेष्ठ नेते शिरीष आप्पा बयस,तालुकाध्यक्ष संजय महाजन,माजी सभापती पुनीलाल महाजन,अँड भोलाणे बापु शहराध्यक्ष सुनील वाणी,शेखर पाटील यांनी केले. त्याप्रसंगी मधुकर रोकडे,नगरसेवक गटनेते कैलास माळी सर,ललित येवले,शरदअण्णा धनगर,गुलाब मराठे,कडू बयस,भालचंद्र माळी,दिलीप महाजन,सुनील,चौधरी,कन्हैया रायपूरकर,सचिन पाटील,टोनी महाजन,राजू महाजन,प्रल्हाद पाटील,अमोल कासार,शरद भोई,विकास चव्हाण,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.