दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर ; यंदा 95.30 टक्के निकाल,निकालात मुलीची आघाडी  

0

पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा 95.30 टक्के निकाल लागला आहे. गतवर्षी पेक्षा निकालात18.20 टक्केने वाढ झाली आहे. निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. कोकण या विभागाचा निकाल सर्वात जास्त तर औरंगाबाद या विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

राज्यातील नऊ विभागांत 3 ते 23 मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात 9 लाख 75 हजार 894 मुले तर 7 लाख 89 हजार 894 मुलींचा समावेश आहे. एकूण 22 हजार 585 शाळांनी नोंदणी केली होती. 4 हजार 979 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती. 9 हजार 45 दिव्यांग विद्यार्थीही परीक्षेला बसले होते. मागील वर्षी 77.10 टक्के इतका निकाल लागला होता. 12.31 टक्केने निकाल होता. दिव्यागाचा निकाल -92.73टक्के निकाल लागला आहे.

विभागनिहाय निकाल टक्केवारीत –
पुणे – 97.34 ,

नागपूर – 93.84 ,

औरंगाबाद – 92.90 – ,

मुंबई – 96.72 ,

कोल्हापूर – 97.64 ,

अमरावती – 95.14 ,

नाशिक – 93.73 ,

लातूर – 93.09 ,

कोकण – 98.77 .

(निकाल- मुले – 93.90 टक्के, मुली – 96.91 टक्के)

Leave A Reply

Your email address will not be published.