गारखेडा येथील २५ वर्षीय तरुण ठरला अवैध वाळू वाहतुकीचा बळी ; तरुणाचा शॉक लागून जागीच मृत्यू

0

जामनेर (प्रतिनिधी): – अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर (नंबर एम. एच.२९ झेड ८६००) च्या धक्क्यामुळे इलेक्ट्रिक तार तुटून वीज प्रवाह घरावरील लोखंडी पत्रे व खांबात उतरल्याने त्या खांबाचा स्पर्श झाल्याने २५ वर्षीय युवकांचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील गारखेडा येथे दि.२७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. शंकर शिवाजी वैराट असे मयताचे नाव असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.

ईश्वर लक्ष्मण वैराट यांच्या फिर्यादीवरून डंपर चालकाच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि.कलम ३०४ अ, २७९, ३३८ मोटर वाहन कायदा १८४, १३४ ब प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांच्या पाच्यात आई,वडील, पत्नी ,तीन विवाहित बहीणी असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे करीत आहे.

अवैध वाळू वाहतुकीला आळा बसणार कधी?
तालुका भरात अवैध वाळू माफीयांनी थैमान घातले असून डंपर चालक भरधाव वेगाने वाहन चालवित असल्याने अनेकदा लहान मोठे अपघात होत असतात. तर निरपराधांना आपला जीवही गमवावा लागत आहे.महसुल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून तहसिल कार्यालयाच्या समोरील दोघ रस्त्यावरून वाळूने भरलेले ट्रक्टर व डंपर ये – जा ‌करीत असतात. या अवैध वाळूमुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी बुडत असून किमान आता तरी कोरोनाच्या काळात त्यांच्यावर त्वरीत कारवाई करून बुडणारा महसूल जमा करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.