खादगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी प्रतिभा पाटील यांची निवड

0

जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खादगाव येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी प्रतिभा राहुल पाटील यांची दि 28 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

खादगाव ग्रामपंचायती मध्ये ठरल्या प्रमाणे उपसरपंच कमलाबाई सोनवणे यांनी अडीच वर्षानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची जागा रिक्त होती त्या जागेवर मंगळवार रोजी उपसरपंच प्रक्रियेसाठी बैठक झाली. यावेळी सर्वानुमते प्रतिभा राहुल पाटील यांची खादगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित उपसरपंच यांचा सत्कार सरपंच ज्योती चौधरी व पुनम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सरपंच पद्माकर चौधरी, विश्वनाथ गोराडे, कमलबाई सोनवणे, जीवन सपकाळ, मुकेश चौधरी, मधुकर चिंचोले, श्रीराम पाटील, ग्रामसेवक भागवत सोनवणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी आदी उपस्थित होते.प्रतिभा पाटील यांची खादगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन,नगराध्यक्ष साधना महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.