अखेर प्रविण जडे यांचा मृतदेह सापडला

0

पारोळा (प्रतिनिधी) येथील विद्यानगर मधील रहिवासी प्रविण प्रभाकर जडे यांचा मृतदेह अखेर आज दि. २८ रोजी  सकाळी सापडला.

याबाबत अधिक मीहिती अशी की, पारोळा येथील रहिवाशी प्रविण प्रभाकर जडे हे रविवारी दि,२६ रोजी आपल्या मुलासह तामसवाडी धरणा जवळ बोरी नदीत पोहण्यासाठी गेले होते. त्यात त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते त्यात बुडाले त्या दिवसापासुन त्याचा शोध घेणे सुरू होता.

काल दि २७ रोजी ही दिवस भर शोध मोहिम राबवण्यात आली या वेळी जळगाव  येथील एन,डी,आर,एफ, च्या पथकाची ही मदत घेण्यात आली. परंतु त्याना ही प्रविण जडे यांचा कुठेही पत्ता लागला नाही. दि, २८ रोजी सकाळी नागेश्वर जवळील बोरी नदीच्या पात्रात एका व्यक्ती चा मृतदेह तरंगत असल्याचे दिसुन आल्याने तपास घेतला असता तो मृतदेह प्रविण जडे याचा अ सल्याचे निष्पन्न झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.