आता कोरोना रूग्णांनवर होणार जामनेरातच उपचार

0

जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील कोरोना बाधीत मध्यम आणी गंभीर अवस्थेतील रूग्णांनाही जळगांव नेण्याची आता गरज भासणार नाही अशी महत्वपुर्ण माहिती माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकारांना दिली.शहरातील उपजिल्हा रूग्णालयामधे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर ५० पाईपलाईनद्वारा ऑक्सीजनबेड प्रणालीच्या कक्षाचा शुभारंभ  महाजनांच्या हस्ते आज (२६) करण्यात आला आहे.त्यावेळी त्यांनी उपजिल्हा रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विवीध सोयी-सुवीधांची माहिती दिली.याप्रसंगी प्रान्ताधिकारी दिपमाला चौरे,तहसीलदार अरूण शेवाळे,नोडल अधिकारी डॉ विनय सोनवणे,डॉ आर के पाटील,डॉ हर्षल चांदा,डॉ प्रशांत महाजन,डॉ जयश्री पाटील, तालुका वैद्यकीय अधीकारी डॉ राजेश सोनवणे, पालीकेचे मुख्याधीकारी राहुल पाटील,पोलीसनिरीक्षक प्रताप ईंगळे,आरोग्य सेवक अरवींद देशमुख आदी होते.

जामनेर,पहुर येथे ८० बेडची व्यवस्था झाली

जामनेरसह तालुक्यातील पहुर येथे या प्रणालीच्या माध्यमातुन सुमारे ८० बेडची व्यवस्था करण्यात आली,यासाठी २०/२५ ऑक्सीजन सिलेंडरचीही उपलब्धता करून देण्यात आली.याउपक्रमासाठी सुप्रीम पाईप कंपनीने आपल्या सिएसआर मधुनही मोलाची मदत करून दिली,शिवाय अन्य सामाजीक संस्थांनीही कोवीड संकटाचा सामना करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगुन शहरात लवकरच १०० बेडचे नॉनकोवीड सेंटर जिएम हॉस्पिटलच्या  माध्यमातुनही तालुकावासीयांना येत्या काही दिवसात सेवा मिळणार  असल्याचेही आमदार गिरीश महाजनांकडुन सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.