चाळीसगाव येथील प्रसिद्ध उद्योगपती रमेशभाऊ अग्रवाल यांचे निधन

0

चाळीसगाव (प्रतिनीधी) : येथील प्रसिद्ध उद्योगपती दानशूर व्यक्तिमत्व रमेशभाऊ अग्रवाल यांचे दुःखद निधन ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे. अत्यंत मनमिळावू आणि  भेटायला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची सामाजिक कार्यकर्त्याची आस्थेवाईक पणे चौकशी करणारे भाऊ सदैव आम्हाला आधारस्तंभ वाटले चाळीसगाव च्या अनेक सामाजिक जडणघडणीत भाऊंच्या मुक्तहस्ते दानाचा सहभाग असायचा सतत अन्नदान गोरगरिबांना कपडे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना उपयुक्त वस्तू या भाऊंच्या मार्फत सतत पुरविल्या जात असत. च्याच्या समाजसेवी  कार्यात देखील रमेश भाऊंचा नेहमी प्रेमाचा हातभार असे आणि मन भरून या कामाचं भाऊ आपुलकीने कौतिक करत बऱ्याच वेळा बोलवून घेऊन या विषयावर खूप गप्पा मारत असत अत्यंत कुशलतेने आपले व्यवसायिक साम्राज्य निर्माण करून त्याचा विस्तार करणारे भाऊ नवउद्योजकांना साठी एक आदर्श व अभ्यासाचा विषय होते. अशा या रमेश भाऊंच्या जाण्याने चाळीसगाव शहरातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्राची खऱ्या अर्थाने हानी झाली आहे हे दुःख फक्त अग्रवाल परिवारावर नसून आम्हा सर्व चाळीसगावकरांवर आहे.

अग्रवाल परिवारास आणि आमचे बंधू योगेश भाऊ अग्रवाल यांना आई जगदंबा हे दुःख पेलण्याची शक्ती देवो आदरणीय दिवंगत रमेश भाऊ अग्रवाल यांना दैनिक लोकशाही परीवारतर्फे हृदयापासून भावपूर्ण श्रद्धांजली

Leave A Reply

Your email address will not be published.