महामार्ग क्रमांक सहा वरील रस्त्याची दैनिय्य अवस्था ; रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन

0

पारोळा (प्रतीनीधी) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रस्त्याची दैनिय्य अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न वाहनधारकांना पडलेला असून रस्त्यावरील खड्डे त्वरित भरण्यात यावे अन्यथा शिवछावा संघटना तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर भोसले व जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला आहे.

फागणे ते तरसोद या रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून रेंगाळत पडलेले असल्याने नवीन रस्त्याचे कामही पूर्ण होत नसल्यामुळे सावखेडा ते मुकटी पर्यंत रस्त्यात मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची खड्डेचा अंदाज नसल्यामुळे बर्‍याच लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मागील काही दिवसा पूर्वी हे काम हाती घेण्यात आले होते. मात्र ज्या ठेकेदारांला खड्डे बुजवण्याचे काम देण्यात आले होते. त्यांनी रस्त्यावरील खड्डे हि व्यवस्थित रित्या कॉलिटी मेंटेन न करता खड्ड्यांमधील माती साफ-सफाई न करता डांबर कमी प्रमाणात टाकून. खडीच्या प्रमाणात टाकल्यामुळे खड्डे बुजविले यानंतर काही तासात हे खड्डे जैसे थे होत असल्यामुळे संबंधित इंजिनिअर व ठेकेदार यांना ब्लॅकलिस्ट करावा अशी मागणी शिवछावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष यांनी केलेली असूनसदर बाब माननीय नितीन गडकरी साहेब यांना पत्रव्यवहार करून लक्षात आणून देण्याचे गरजेचे आहे या खड्ड्यांमुळे जनतेला आपला जीव संबंधित यंत्रणेने व्यवस्थित रित्या खड्डे बुजवले नसल्या कारणाने गमवावा लागतो.

या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी देखील मागील दोन वर्षापासून झालेल्या खर्चाचा अहवाल नियम आणि अटी पाहून संबंधितांना जाब विचारने जरुरी आहे व खड्ड्यांमुळे जीव गमावणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हा दंडाधिकारी यांनी मानूष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.