भुसावळात गावठी कट्टयासह एकास अटक ; बाजारपेठ पोलिसांची कामगीरी

0

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात स्टार लान्स वांजोळा रोड भागातून बाजारपेठ पोलीस पथकाने गावठी कट्टयासह रविवारी रात्री एका आरोपीस ताब्यात घेतले.

शहरातील वाल्मिक नगर भागातील इसम हा स्टार लान्स वांजोळा रोड भागात ५ जुलै रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास सार्वजनिक जागी कब्यात गैरकायदा गावठी कट्टा ताब्यात बाळगून फिरत असल्याची माहिती सपोनि संदिप परदेशी यांना मिळाल्याने त्यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशन निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप परदेशी, पोलीस नाईक रविंद्र बि-हाडे,रमण सुरळकर, महेश चौधरी,नेव्हील बाटली,तुषार पाटील, उमाकांत पाटील पो.कॉ बंटी कापडणे,विकास सातदिवे, कृष्णा देशमुख ,प्रशांत परदेशी,ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे अश्यांनी त्वरीत घटनास्थळी जाऊन सापळा रचुन एकास ताब्यात घेतले व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने चंद्रकांत विनोद घेघंट (वय १९ रा.वाल्मीक नगर भुसावळ) असे सांगितले दरम्यान त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेला १०,००० /- रु.कि.चा एक गावठी कट्टा,५००/- रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस, त्याच्या जवळ  मिळुन आल्याने त्याचे विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला भाग ६ गु.र.न ६८८/२०२० आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास पो.हे कॉ सुनिल जोशी असे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.