शिरवेल महादेव दर्शनापासून महाराष्ट्रातील भाविक राहणार वंचित?

0

चिनावल (वार्ताहर) : महाराष्ट्र च्या सिमेपासून जवळ असलेल्या मध्यप्रदेश मधील सुप्रसिद्ध शिरवेल च्या महादेव दर्शनापासून यंदा महाराष्ट्रातील भाविकांना वंचीत राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने भोले बाबा च्या भक्तांचा हिरमोड झाला आहे.

दरवर्षी श्रावण महिन्यात निसर्ग रम्य व जागृत अश्या शिरवेल महादेव मदीरावर महाराष्ट्र सह मध्यप्रदेश मधील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात मात्र यंदा कोरोना रोगाच्या महामारी संकटाने सर्वच मदीरे बंदच आहे मात्र मध्यप्रदेशातील शिरवेल महादेव मंदिर हे निसर्ग निर्मित असल्याने येथील निसर्गसौंदर्य अवर्णनीय आहे उंचावरून पडणारा पाण्याचा धबधबा ,व लांबलचक गृहा मध्ये असलेले स्वयंभू शिवलिंग दर्शनासाठी भक्तांना मोठ्या कसरतीने जावे लागण्याची हौस ही वेगळीच अशात दरवर्षी श्रावण महिन्यात महाराष्ट्रातील रावेर ,यावल ह्या सातपुडा पर्वत ला लागून असलेल्या भाविकांसह चोपडा , भुसावळ , जळगाव ,ह्या तालुक्यातील ही भाविक १ दिवस अगोदरच येथे डेरेदाखल होत असत अतिशय खडतर मार्ग व त्यात डोंगर दऱ्या नैसर्गिक धबधबा व दर्शनासाठी असलेली आस भक्ताना एक पर्वणीच असते.

यंदा मात्र कोरोना महामारी ने देवालय तर बंद केलेच मात्र आता भोले बाबा च्या दर्शनासाठी असं लावून बसलेल्या महाराष्ट्रातील भक्तांना यंदा मात्र शिरवेल महादेव दर्शनापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता शिरवेल (मध्यप्रदेश) च्या ग्रामस्थांनी घेतलेल्या पावित्र्या वरुन निर्माण झाली आहे.

स्थानिकवृत्तपत्र दै पत्रिका च्या वृत्तानुसार शिरवेल चे सरपंच विकास सेनानी यांनी या बाबत शिरवेल चौकी चे पी.आय.दिनेश सिंह सोलंकी याना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्रात कोरोना महामारी मोठ्या प्रमाणात आहे. अश्या परिस्थितीत महाराष्ट्रातील भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिल्यास येथे ही धोका निर्माण होऊ शकतो या साठी महाराष्ट्रातील भाविकांना यंदा चे वर्ष प्रतिबंध व्हावा अशी विनंती केली आहे तसेच सरपंच सर सदस्य भगवान पुरा व खरगोन बर्हाणपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही निवेदन देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

येथल्या २० जुलै पासून भाविक दर्शनासाठी येतील त्या आधी शिरवेल ग्रामस्थांनी हा निर्णय घेतल्याने सद्यस्थितीत तरी महाराष्ट्रातील शिरवेल महादेव दर्शन यंदा होईल की नाही असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.