राज्यातील कोरोना संसर्ग थांबेना ! ६ हजार ५५५ नवीन रुग्ण आढळले

0

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कायम असून राजधानी मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मागील २४ तासात राज्यात ६५५५ इतके कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर  २४ तासात १५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्णसंख्येनं दोन लाखांचा टप्पा पार केला आहे.

दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे राज्यात ३६५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १,११,७४० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.०८ % इतके झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२७ % एवढा आहे. सध्या राज्यात ८६ हजार ०४० रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११,१२,४४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,०६,६१९ (१८.५७ टक्के ) नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,०४,४६३ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४६,०६२ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोना मृत्यूंचा आकडा वाढत चालला आहे. काल १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृत्यूंची संख्या ८ हजार ८२२ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी मुंबई मनपा-६9, ठाणे मनपा-3, कल्याण-डोंबिवली मनपा-८, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा- भाईंदर- १, वसई-विरार मनपा-४, जळगाव-६, जळगाव मनपा-४, पुणे-३, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-८, सोलापूर मनपा-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-१० या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.