जिल्ह्यात कोरोनाने तोडले आजपर्यंत सर्व रेकॉर्ड ; आज ‘इतके’ रुग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचे थैमान सुरूच आहे. आज दिवसभरात २५४ रुग्ण आढळले आहे. रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४ हजार ४३० वर पोहचली आहे.

रविवारी सर्वाधिक कोरोनाबाधीत हे जळगाव शहरात 64 रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

आज नव्याने 254 रूग्णांची त्यात भर पडली आहे. यात जळगाव शहर 64, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 8, अमळनेर 15, चोपडा 23, पाचोरा 4, धरणगाव 6, यावल 25, एरंडोल 13, जामनेर 2, रावेर 22, पारोळा 3, चाळीसगाव 19, मुक्ताईनगर 21 , बोदवड 24 व अन्य जिल्ह्यातील 2 याप्रमाणे रुग्णांच समावेश आहे.

आज दिवसभरात 8 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 3, जळगाव तालुक्यातील 2 पारोळा, जामनेर आणि एरंडोल प्रत्येकी याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात १३५ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत २६११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.जिल्ह्यात विविध रुग्णांमध्ये १०८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.