दहा वर्षीय बालिकेवर वृध्दाने केला अत्याचार

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील महाळपुर येथील एका दहा वर्षीय बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याच्या घटनेने समाजमन सुन्न झाला आहे. हि घटना दि ३ रोजी घडली.

तालुक्यातील महाळपूर येथील वडील शेतात तर आई अमळनेर येथे दवाखान्यात गेली असताना त्यांचे एक चौदा वर्षीय मुलगी व एक दहा वर्षाची मुलगी, व सात वर्षांचा मुलगा असे तीघे जण घरी असताना गावातील महादू भिला थोरात याने दहा वर्षे मुलीला माझ्यासोबत चल असे सांगून माझा हात पकडून मला गावा बाहेरच्या भवानी मातेच्य मंदिरा जवळ घेऊन गेला व माझ्याशी अश्लील चाळे करू लागला. मी आरडाओरड केल्याने त्यावेळेस माझी आत्या शेतात जात असताना तिला माझा आवाज ऐकू आल्याने ती तेथे आली तेव्हा महादू पळून गेला. आत्याने मुलीला घरी नेऊन सोडून शेतात चालली गेली दुपारी ४:३० वा मुलगी घरी रडत असताना तिच्या आईने तीस विचारले त्यावेळी तिने घडलेली हकीकत सांगितली त्यानंतर दिनांक ३ रोजी रात्री मुलीला घेऊन आई-वडील परोळा पोलीस ठाण्यात आले.

पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात महादू भिला थोरात वय ६५ राहणार (महाळपुर ता.पारोळा) याविरुद्ध फिर्याद देऊन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाचोरा पोलीस स्टेशन विजया वसावे हे करीत आहेत.तर रात्री उशिरा मुलीची वैद्यकीय तपासणी साठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. आरोपी महादु थोरात हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.या घटनेमुळे तालुक्यात संताप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.