धक्कादायक! प्रेमविवाहाच्या चार दिवसानंतर पती-पत्नीची आत्महत्या

0

नवी दिल्ली | प्रेमविवाहाच्या चार दिवसानंतर पतीने रेल्वेसमोर उडी घेऊन तर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमधून समोर आली आहे. विशाल आणि निशा असे आत्महत्या केलेल्या पती पत्नीचे नाव आहे. माहितीनुसार विशाल हा कविनगर पोलीस स्टेशन परिसरात कोचिंग क्लास घेत होता. चार वर्षापुर्वी त्याची ओळख निशासोबत झाली निशा एका मल्टी नॅशनल कंपनीत एच आर मॅनेजर म्हणून जॉब करत होती.

चार वर्षाच्या प्रेमसंबधानंतर 29 जून रोजी कुटुंबियांच्या संमतीने दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर निशाने सासरच्या घरी पोहोचल्यावर सर्व विधी आनंदात पार पाडले. त्याचा एक व्हिडीओ सुद्धा तिने शेअर केला.

मात्र सर्व विधी पार पडल्यानंतर विशाल न सांगताच घराबाहेर पडला, त्यानंतर रात्री उशीरापर्यंत तो घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना कळविले. विशालचा भाऊ सांगतो की विशाल संध्याकाळपर्यत परत आला नाही तेव्हा आम्ही त्याचा फोन लावला मात्र त्याने फोन घरातच ठेवला होता.

त्यानंतर पोलिसांनी विशालचा फोटो कुटुंबियांकडून घेऊन त्याची शोधाशोध केली असता. विशालचा मृतदेह रेल्वे पटरीवर आढळून आला. दरम्यान या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी निशाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अगदी चार दिवसांपुर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या जोडप्याने अचानक आत्महत्या केल्यानं कुटुंबियांवर संकटाचा डोंगरच कोसळला आहे. या घटनेमुळं संपुर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. निशा आणि विशाल यांनी आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.