धक्कादायक : देशात करोनाने केला नकोसा विक्रम, २४ तासांत वाढले एवढे ‘रुग्ण’

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या आकड्यांचे नवीन रेकॉर्ड होत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दर तासाला सरासरी एक हजार नवीन रुग्णांची नोंद केली जात आहे. मागील चोवीस तासांत देशभरात २४ हजार ८५० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, ६१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहचली आहे.

देशभरातील तब्बल ६ लाख ७३ हजार १६५ करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ लाख ४४ हजार ८१४ जण, उपाचारानंतर रुग्णालायतून सुट्टी देण्यात आलेले ४ लाख ९ हजार ८३ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १९ हजार २६८ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या (Coronavirus Patient ) संख्येने हादरुन गेला आहे. मागच्या 24 तासांत राज्यात 7074 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 200064 वर गेली आहे. शनिवारी 295 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या 8671वर गेली आहे. तर मुंबईत रुग्णांची एकूण संख्या 83237 वर गेली असून फक्त मुंबईत आत्तापर्यंत 4830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.