भुसावळात भर दिवसा महामार्ग अधिकार्‍यास लुटले ; दोघाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे रुग्णालया जवळ भर दिवसा महामार्ग अधिकार्‍यास शस्त्राचा धाक दाखवत दोघांनी लुटल्याची घटना गुरुवार २ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघा अज्ञातांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महामार्ग विभागाचे अधिकारी आनंद शर्मा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर रेल्वे हॉस्पीटल जवळून चारचाकी (एम.एच.१९ सी.वाय.२४२२) ने घराकडे निघाले असतांना रेल्वे रुग्णालयाजवळ एका दुचाकीने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याने वाद वाढला. दुचाकीवरून दोघांनी यावेळी धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी व बोटातील पाच ग्रॅम वजनाची अंगठी हिसकावत पळ काढला. शर्मा यांनी शहर पोलिसात धाव घेत आपबीती कथन केल्याने दोघांविरुद्ध रस्तालुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.