एस.टी.बसला आले वाईट दिवस ; प्रवासी वाहतूक सोडून वाहव्या लागताहेत सिमेंटच्या गोण्या

0

निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : एके काळी लाल परी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस कोरोना महामारीच्या संकटात सापडली आहे. सध्या शासनाने सर्वत्र लॉक डाउन केल्यामुळे कुणीही घराबाहेर निघत नाही किंवा एसटी बस वर कुणीही प्रवास करत नाही. त्यामुळे लाल परीवर वाईट दिवस येवून ठेपले असून शेतकरी वर्गाची सेवा करावी लागत आहे. सध्या शासनाने काही माल वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर बंदी घातली असल्याने एस टी बस शेतकऱ्यांसाठी भाडे तत्वावर काम करु लागली आहे.

दि, ४ जुलै रोजी सिमेंटच्या गोण्या भरुन ताडे भातखेडे गावात आलेली बस पाहून मनाला खूप वाईट वाटले. कारण एकेकाळी लाल परी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस प्रवासी वाहतूक सोडून रासायनिक खते व सिमेंट च्या गोण्या भरुन वाहतूक करत आहे. असे प्रत्येकाच्या जीवनात घडत असते आपला काही काळ मौज मजेत गेला असला तरी काही काळासाठी वेदना ह्या भोगाव्या लागतात जिवनात चढ उतार येत असल्याने खचून जाऊ नये. वय वृद्धांसाठी हाप तिकीटावर घेऊन जावून एसटीने काही दिवस सेवा केली मात्र आता वयवृध्दांना प्रवास करणे नाकारलेअसून बसवर घेऊन जाण्यासाठी नकार दिला जातोय आणि जायचेच असेल तर दुपटीने भाडे द्यावे लागणार आहे. कोरोनाची महामारी लवकर जावो व पुन्हा चांगले दिवस लाल परीला येवोत हिच अपेक्षा.

Leave A Reply

Your email address will not be published.