राज्यात आढळले विक्रमी ६ हजार ३६४ नवे रुग्ण

0

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नाहीय. करोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मागील २४ तासात महाराष्ट्रात ६ हजार २३४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. तर मागील २४ तासात १९८ मृत्यू करोनामुळे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या या संख्येमुळे महाराष्ट्रातील करोना एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ९२ हजार ९९० इतकी झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आज राज्याच्या विविध रुग्णालयातून ३ हजार ५१५ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ४, ६८७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दर ५४. २४ टक्के इतका आहे. विविध रुग्णालयात ७९ हजार ९११ इतक्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.