मा.सभापती नगरसेविका योजनाताई पाटील व खान्देश वधु वर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील यांच्या मार्गदर्शनाने विना हुंडा आदर्श विवाह संपन्न

0

भडगाव । प्रतिनिधी

चि.कुणाल(विक्कीदादा) श्रीराजेंद्रराव भास्करराव भोसले(बँक अधिकारी धुळे)  रा.आमडदे ह.मु.धुळे यांचे सुपुत्र कु.जया (देवयानी)मा.श्री.जिभाऊसो.रमेश नारायणराव पाटील रा.धमाणे ह.मु.आमदे ता.पानसेमल जि.बड़वानी (म.प्र.) यांची सुकन्या
यांचाआदर्श शुभ विवाह दि.29 जून रोजी
घरगुती वातावरणात अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितित कोरोना पार्श्वभूमीवर केंद्र सरकार,म.प्र.शासन व महाराष्ट्र शासन नियमानुसार फिजिकल डिस्टेंट ठेऊन उत्साहात संपन्न झाला वरील दोन्ही परिवारांनी सर्वसंमतीने व विशेष म्हणजे मुलाचे मामा मांडळकर
भानुदास हिंमतराव सोनवणे
व मुलीचे मामा माळीचकर (नाशिक)
डॉ.किशोर भिमराव बोरसे
या दोन्ही मामांनी तसेच मुलाचे काका आमडदेकर .संजयराव भास्करराव भोसले व आदर्श प्रा. बाळासाहेब भास्करराव भोसले (कल्याण),मुलाचे जिजाजी प्रा. योगेंद्र बच्छाव सर(नाशिक),आमडदे मा.सरपंच .रणजितराव भोसले,वधुचे काका (आमदेकर) .देवराज वामनराव पाटील,.भिकाजीराव गिरधरराव पाटील.दिनेश नारायणराव पाटील,खान्देश वधु वर ग्रुप संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील, मुख्याध्यापक/प्राचार्य डी.डी.पाटील सर,आमडदे पोलिस पाटील सौ.सपनाताई तुषारराव भोसले,नगरसेविका योजनाताई पाटील,वधुचे भाऊ केमिस्ट प्रदीप रमेश पाटील (नाशिक) आदि मान्यवारांनी
बिनाहुंडा विवाह करण्याचा संकल्प* केला.
या दोन्ही परिवाराचा हा संकल्प मराठा समाजातील आदर्श परंपरेचा आदर्श पायंडा राहील. ही परंपरा आपल्या ग्रुपचा पायंडा म्हणून निश्चितच अनुकरणीय आहे. हा रिवाज सर्वमान्य होत असल्याचा आपणास अभिमान आहे.बिनाहुंडा विवाह पद्धतीचे अनुकरण समाजातील सर्वच लहान-मोठे, श्रीमंत-गरीब परिवारांनी करून वेळ, खर्च वाचवा व समाजाला एक नवी आदर्शवत द्यावी.असे आवाहन खान्देश वधुवर ग्रुपचे बापूसाहेब सुमित पाटील,संजय वाघ व नगरसेविका योजनाताई पाटील यांनी या निमित्ताने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.