महाराष्ट्रात कोरोनाने रेकॉर्ड तोडला, 24 तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण

0

मुंबई । गेले तीन महिने राज्यात कोरोनाचे संकट सुरु आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात आज आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण सापडण्याचा उच्चांक गाठला आहे. दिवसभरात एकूण ६ हजार ३३० रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. दुसरीकडे आज ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १,०१,१७२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.२१ % एवढे झाले आहे.

आज सर्वाधिक रुग्ण कोरोनामुक्त राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या मुंबई शहरातच झाले आहेत. आज मुंबईत ७०३३ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.दरम्यान राज्यात आज ६३३० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. आता राज्यातील एकूण रुग्णसंख्या १८६६२६ इतकी झाली आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनंतर सध्या राज्यात ७७२६० रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत आहेत. राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सकारात्मक दिसून येते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.