राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देणं शासनाला अवघड; कर्ज काढण्याची आली वेळ

0

मुंबई । राज्यात गेले ४ महिने असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य सरकारचा महसूल घटला असून पगार देण्यासाठी पैसे नाहीत, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढण्याची वेळ देखील येऊ शकते, अशी चिंताही विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. पुनर्वसन विभागाच्या बैठकीसाठी पुण्यात आले असता झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी वडेट्टीवार म्हणाले, ‘कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. कोरोनामुळं शासनाच्या महसूलात घट झाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुढील महिन्यात कर्ज काढावे लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मदत व पुनवर्सन, आरोग्य आणि इतर दोन विभाग वगळता इतर विभागात वेतन कपात करण्याची वेळ आली आहे. मात्र, डॉक्टर, नर्स आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या करोना योद्ध्यांचे पगार दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.