जळगाव जिल्ह्यात आज आणखी 138 जणांना कोरोनाची लागण

0

जळगाव – जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 138 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ३७२० इतकी झाली आहे.
जिल्ह्यात आज तब्बल 138 रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर 39, जळगाव ग्रामीण 6, एरंडोल 3 , जामनेर 3, रावेर 10; अमळनेर-7; भुसावळ-13; चोपडा-11; पाचोरा-1; भडगाव-5; धरणगाव-1; मुक्ताईनगर 1, यावल 13 ,चाळीसगाव 1 ; पारोळा-5, बोदवड-19; असे रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असून अमळनेर व धरणगाव तालुक्यातील प्रत्येकी 2, मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील प्रत्येकी 1 अशा सहा कोरोनाबाधीतांचा बुधवारी मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.