आजपासून बदलले एटीएममधून पैसे काढणे आणि बचत खात्यात पैसे ठेवण्याच्या संबंधीचे नियम, घ्या जाणून

0

मुंबई । कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर, 24 मार्च 2020 रोजी, देशभरातील लॉकडाऊनच्या घोषणेच्या दिवशी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी एटीएम शुल्क आणि बचत खात्यातील किमान शिल्लक ठेवणे हे बंधन 3 महिन्यांसाठी हटवले होते. यानंतर ग्राहकांना कोणत्याही बँकेच्या जवळच्या एटीएममधून कधीही पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली. तसेच, जास्तीच्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क देण्याची गरजही नव्हती. लोकांना यावेळी असे सांगितले होते की ही सूट देण्यात आली आहे जेणेकरुन लोकांनी पैसे काढण्यासाठी घराबाहेर पडू नये. या दोन्ही सवलती 30 जून 2020 पर्यंत होती म्हणजेच आजपासून आता हे नियम बदलतील.

खात्यात किमान शिल्लक नसेल तर होईल दंड
देशातील प्रत्येक बँक आपल्या बचत खात्यात किमान रक्कम ठेवण्यास सांगते. जर ही किमान शिल्लक नसल्यास ग्राहकांकडून दंड आकारला जातो. केंद्राकडून ही किमान शिल्लक रक्कम शिथिल झाल्यानंतर कोणत्याही बँकेने ती आणखी वाढविण्याची घोषणा केलेली नाही. त्याचबरोबर अर्थ मंत्रालयाकडूनही ती सुरू ठेवण्यासाठी कोणतीही माहिती मिळालेली नाही. म्हणूनच असे मानले जात आहे की अशा परिस्थितीत एटीएम शुल्काची सवलत आणि किमान शिल्लक यांवरील सवलत ही बंद होईल.

प्रीमियम खात्यासाठी अधिक किमान शिल्लक
केंद्राने दिलेली सूट शिथिल झाल्यानंतर आता आपल्या बचत खात्यात किमान शिल्लक पाच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत ठेवता येईल, असे बोलले जात आहे. हे प्रीमियम खात्यांसाठी देखील अधिक असू शकते. हिताची पेमेंट सर्व्हिसचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (कॅश बिझिनेस) रुस्तम इराणी म्हणाले की,’ सरकारने या दोन्ही सवलती देण्याचा सरकारचा निर्णय चांगला होता, मात्र ते पुढे सुरु ठेवायचे कि नाही याचा निर्णय अजूनही घेण्यात आलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.