निंबाच्या झाडाला गळफास घेऊन वडली येथील तरुणाची आत्महत्या

0

जळगाव । तालुक्यातील वडली येथील २३ वर्षीय तरूणाने निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. रितेष उर्फ राजू सुरेश पाटील (वय-२३)असे या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रितेष याने राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या देवराम महाराज मंदीराच्या मागे निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आला. गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने कुठल्याच ठिकाणी काम मिळत नसल्याने नैराश्य आले होते. राजू हा वाहन चालक होता. ट्रॅक्टर, चारचाकी कार, मालवाहू वाहनांवर रोजंदारीने तो कामाला जात होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.