जोगलखेडे येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या

0

पारोळा (प्रतिनिधी) : जोगलखेडे ता,पारोळा येथील एका कर्जबाजारी 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने त्याच्या स्वताच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना 28 रोजी दुपारी 3 वाजता उघडकीस आली.

याबाबत जोगलखेडे येथील कैलास लोटन पाटील( वय 30) हा काल ता,28 रोजी शेतात निंदणीसाठी जातो असे सांगून गेला तो रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी शोध शोध केली मात्र कैलास हा मिळून आला नाही.आज दुपारी त्याच्या स्वताच्या शेतात कैलासचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून कुटीर रुग्णालयात दाखल करून डाँ योगेश साळुंखे यांनी तपासून मयत घोषित केले.याबाबत वडील लोटन राजाराम पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवलदार आशिष चौधरी हे करीत आहेत.मयताच्या पश्चात आई,वडील,व भाऊ असून कैलास हा अविवाहित होता.त्याने पतसंस्था व सोसायटीच्या कर्जबाजारीपणा मुळे तो नेहमी नैराश्यात असायचा म्हणून कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईक यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.