खामगाव येथे प्रेमी युगालाची आत्महत्या

0

खामगाव (प्रतिनिधी) : बाळापुर येथील मन नदित उडी घेऊन प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची घटना काल सोमवारी उघडकीस आली. शिवाजी नगर सुटाळा बु. येथील अक्षय अशोक घरत (वय२०) या युवकाने प्रियसीसोबत आत्महत्या केली.

अक्षय घरत हा गेल्या दोन दिवसापासुन बेपत्ता असुन तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असुन त्याच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती. गेल्या दोन दिवसापासुन तो बेपत्ता असुन त्याच्या नातेवाईकाकडुन शोध घेण्यात आला होता. मुलाचे मामा हे सुंदरखेड येथील रहिवासी आहे. त्याची आई ही घरी एकटीच आहे. त्याची प्रियसी ही खामगाव परिसरातली असुन त्यांनी नदित उडी मारून आत्महत्या केली. त्या दोघांचे मृतदेह बाळापुर येथिल‌ मन नदिच्या पुलाखाली तरंगतांना दिसले आहे. पोलीसांनी दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले असुन मुलाचे नाव अक्षय अशोक घरत आहे. मुलीची ओळख पटलेली नाही. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथे पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.