केंद्र सरकारकडून अनलॉक- २ साठी नव्या गाईडलाईन्स जारी; काय सुरू,काय बंद राहणार?

0

नवी दिल्लीः केंद्र सरकारने अनलॉक- २ साठी आज मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे. कॅन्टोन्मेट झोन वगळता शहराच्या अन्य भागांमध्ये अधिकाधिक आर्थिक व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे. देशात रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी राहील.

नव्या टप्प्यात आर्थिक व्यवहारांचा विस्तार केला जाईल. पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकाच वेळी येऊ शकतील, अशी मोठी दुकाने उघडली जाऊ शकतील. केंद्रीय व राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था १५ जुलैपासून सुरू होणार असून त्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार आहे.

काय सुरू आणि काय बंद राहणार?
-शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थानं ३१ जुलैपर्यंत बंद राहणार.
-ऑनलाइन डिस्टन्स लर्निंगला परवानगी कायम. चालनाही देणार.
-गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासाला मुभा नाही.
-मेट्रो आणि रेल्वे सेवा राहणार बंद.
-चित्रपटगृहं, जिम, स्विमिंग पूल, पार्क, बार, असेंबली हॉल आणि अशाप्रकारच्या जागांवर बंदी कायम.
-सामाजिक / राजकीय / खेळ / धार्मिक कार्य / मनोरंजन / सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी कायम.
-कन्टेन्मेंट झोनच्या बाहेर केंद्र आणि राज्य प्रशिक्षण संस्था १५ जुलैपासून कार्यरत ठेवण्याची परवानगी

नाईट कर्फ्यू
-केंद्र सरकारनं नव्या गाईडलाईन्सप्रमाणे नाईट कर्फ्यू कायम ठेवला आहे. परंतु अत्यावश्यक सेवांच्या परिचालनासाठी परवानगी देण्यात आली आहे.
-नाईट कर्फ्यूची वेळही कमी करण्यात आली असून आता ती रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.