नगरपरिषदेच्‍या निवडणुका डोळ्‍यासमोर ठेऊन विरोधकांचे राजकारण-आ.संजय सावकारे

0

भुसावळ (प्रतिनिधी)-आगामी वर्षभरात येऊ घातलेल्‍या भुसावळ नगरपरिषदेच्‍या सार्वत्रिक निवडणुका डोळ्‍यासमोर ठेऊन वरणगाव-हतनुर येथील राज्‍य राखीव पोलीस केंद्र अहमदनगर जिल्‍ह्‍यात हलविण्‍यात आल्‍याचा विरोधी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गाजावाजा करून माझ्‍यावर खोटे खापर फोडण्‍याचा प्रयत्‍न करीत असल्‍याचे आ.संजय सावकारे यांनी सांगितले.
सन १९९६ मध्‍ये तत्‍कालीन मंत्री स्‍व.गोपीनाथ मुंडे,एकनाथराव खडसे यांनी या केंद्राचे भूमीपूजन केले होते.त्‍यावेळी माझा राज कारणाशी कुठलाही दुरपर्यंत संबंध नव्‍हता व मी इंजिनीअरची नोकरी मुंबईला करायचो.सन २००९ मध्‍ये आमदार झालो.त्‍यावेळी अनेकांना प्रकल्‍पाचा विसर पडला होता व शेतक-यांच्‍या जमीनी त्‍यात अडकल्‍या होत्‍या.याबाबत विधानसभेत आवाज उचलला.तत्‍कालीन गृहमंत्री स्‍व.आर.आर.पाटील यांच्‍याशी चर्चा करून बंद होणारा प्रकल्‍प जिवंत ठेवून चालना दिली.राज्‍यात भाजपचे सरकार आले व तत्‍कालीन मुख्‍यमंत्री , महसूल मंत्री व मी प्रयत्‍न केल्‍याने पोलिस प्रशिक्षण केंद्राला राज्‍य राखीव पोलीस केंद्र म्‍हणुन मान्‍यता दिली होती.राज्‍यात आता महाविकास आघाडीचे सरकार आले असुन त्‍यांनी हे केंद्र अहमदनगर जिल्‍ह्‍यात हलवून जिल्‍ह्‍यावर अन्‍याय केले असून या विरोधात न्‍यायालयात दाद मागणार आहे.
राज्‍यात सत्ता परिवर्तन झाल्‍याचा मी दोषी कसा?भुसावळच्‍या राष्‍ट्रवादीतील विरोधकांना प्रकल्‍प बाहेर गेल्‍याचे दु:ख नाही फक्‍त त्‍यांना राजकारण करायचे आहे त्‍यांचा बोलवता धनी कोण आहे हे सर्वांना माहित आहे.
कृषी महाविद्यालय मंजूर केले होते मात्र १०० एकर जागेअभावी ते मुक्‍ताईनगरला गेले तर तालुक्‍यात कापूस उत्‍पादक कमी असल्‍याने टेक्‍सटाईल पार्क जामनेर येथे हलवले ह्‍या सर्व तांत्रिक अडचणी होत्‍या मात्र प्रकल्‍प जिल्‍ह्‍याबाहेर गेले नव्‍हते.माजी आमदारांनी व्‍यापारी संकुलाच्‍या नावाखाली लोकांकडून पैसा उकळला.
नगराध्‍यक्ष असतांना उमेश नेमाडे यांनी एक काम केले नाही.भुसावळ एमआयडीसी मध्‍ये काही नवीन प्रकल्‍प आले तर काही लोकांच्‍या दहशतीमुळे नवीन उद्‍योजक येण्‍यास तयार नाही.आता विरोधकांची सरकार आहे त्‍यांनीही प्रकल्‍प रोखण्‍यासाठी प्रयत्‍न करायला पाहिजे होते.
कोरोना काळात सुध्‍दा विरोधकांनी राजकारण केले होते.विरोधकांचा उद्‍देश फक्‍त पैसा असून जनतेला सर्व माहित असून कितीही स्‍वप्‍न पाहिले तरी नगरपरिषदेचे विरोधकांचे स्‍वप्‍न पुर्ण होणार नसल्‍याचेही आ.सावकारे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.