पिलखोडला पती कोरोना पॉझीटीव्ह तर पत्नी निगेटिव्ह

0

पिलखोड, ता. चाळीसगाव (वार्ताहर) : पिलखोड येथील 55 वर्षीय महिला गेल्या 3 -4 दिवसापासून श्वासघेण्यास त्रास होत होता. म्हणून चाळीसगाव येते उपचारांसाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. व तिथून जळगाव येते सिव्हिल हॉस्पिटल येते उपचारअर्थ दाखल करण्यात आले तसेच महिलेचे पती यांनाही तापाने 7 ते 8 दिवसापासून ग्रासले होते म्हणून त्यांना चाळीसगाव येते कॉविड सेन्टरला येथुन जळगाव येथे सिव्हिलला पाठवण्यात आले. परंतु दि 29 रोजी पतीचा रिपोर्ट कोरोना पॉझीटीव्ह प्राप्त झाला व पत्नीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला अशी माहिती तालुका नोडल अधीकारी डॉ बी. पी .बाविस्कर व तालुका वैधकीय अधिकारी डॉ देवराम लांडे यांनी दिले.

गल्ली सील केली
सदर रिपोर्ट प्राप्त होताच नोडल अधिकारी डॉ बी पी बाविस्कर व डॉ देवराम लांडे तहसीलदार अमोल मोरे गट विकास अधिकारी अतुल पाटील यांनी सदर पेशंटच्या गल्लीची पाहणी करून आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या व 14 दिवस परेंत गल्ली सील करण्यात आली व 3 दिवसा पासून ग्रामपंचायती मार्फत गावात फवारणी तसेच आरोग्य सेवक स्वप्निल खेरणार व आशा वरकर्स यानी संपूर्ण गावात फिरून प्रत्येक घरोघरी जाऊन आरोग्य तपासणीचा सर्वे केला मेहुनबारे पोलीस स्टेशनचे ए पी आय सचिन बेंद्रे यांच्या मार्ग दर्शनाखाली बस स्टॅंड परिसरातील चोक बंदोबस्त सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.